टॉप बातम्या

तहसीलदार प्रशांत बेडसे यांची सोलापूरातील मोहोड येथे बदली

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२० सप्टें.) : वरोरा तहसील कार्यालयातील तहसीलदार प्रशांत बेडसे यांची बदली सोलापूर जिल्ह्यातील मोहोड येथे झाली. बेडसे यांनी २६ फरवरी ला वरोरा येथील पदभार सांभाळला होता. त्यांनी येताच आपला सरकारी खाक्या दाखवून राजकिय नेत्याचा व नागरिकांचा रोष ओढावून घेतला होता तर, पत्रकारांना  सोबत सुद्धा 'तू तू मै मै' असे प्रकार करून आपली स्वच्छ छबी दाखविण्याचा प्रकार केल्याने पत्रकार मंडळी सुद्धा त्याच्यावर नाराज होती.

कुसुम्बी येथील २४ आदिवासींच्या जागेच्या बळजबरीने बळकावण्याच्या प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर त्यांनी आपली बदली करिता हालचाली केल्या होत्या व अखेर त्याची बदली सोलापूर जिल्ह्यातील मोहोड येथे झाली. त्यांचे जाण्याने महसूल विभागात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
हे विशेष..
Previous Post Next Post