सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (०१ संप्टें.) : कोविड ची भयानकता लक्षात घेता वरोरा येथील व्यावसायिक, चिरतरुण, आणि सामाजिक दायित्व जोपासून अगदी साधेपणाने मा. समीर पोपट यांनी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे लहान मुलांना बेबी किट आणि रुग्णांना फळ वाटप करून आपला जन्मदिवस साजरा केला.
कोविड च्या या भयावह परिस्थितीत स्वतः वर फिजुल खर्च न करता, रुग्णाच्या सहवासात, मित्र-परिवारासह जन्मदिवस साजरा केला. या त्यांच्या सामाजिक बांधीलकीची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.