Top News

सिनेस्टाईल पाठलाग, बल्लारपूर खुनातील फरार आरोपिंना घेतले ताब्यात

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (०१ संप्टें.) : मारेगाव नजीक एक वाहन रस्त्याच्या कडेला मंगळवारी सकाळी पलटली. त्या वाहणातील जखमींना लोकांनी वाहनाच्या बाहेर काढीत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, काही वेळातच मागावून स्कार्पिओ वाहनातून जखमी आरोपी पसार झाल्यानंतर चर्चेला उधाण आले की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका युवकाचा खून करून इंडिगोने ते भरधाव निघाले असता, पळून जातांना त्यांच्या वाहनाला अपघात झाला... खरा..!

प्राप्त माहितीनुसार, बल्लारपूर येथे सोमवारला रात्री स्क्वेअर पॉइंट बीअर बार समोर मिलिंद बोन्दाडे (३२), सलमान शेख (२४) व गणेश जंगमवार (२४) यांचा धूंदीत असतांना वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होत थेट बीअर बॉटलने मिलिंद यांच्या डोक्यावर प्रहार केला. रक्ताच्या थारोळयात निपचित पडल्याने त्यास चंद्रपुर येथे दाखल केले व येथे मिलिंदचा मृत्यु झाला.

दरम्यान, संशायित आरोपींनी पोबारा करीत यवतमाळच्या दिशेने चारचाकी वाहनाने धूम ठोकली. भरधाव वेगाने येत असतांना मांगरुळ नजीक चालकाचे नियंत्रण सुटून राज्य महामार्गाच्या कडेला इंडिगो आदळली. वाहनातील तिघे जखमींना धाव घेतलेल्या नागरिकांनी बाहेर काढले. जखमीनी थेट मारेगाव रुग्णालयात उपचार घेतले आणि मागावून आलेल्या स्कार्पिओ कार ने पसार झाले.

घटनेची गंभीरता लक्षात घेवून बल्लारपुर पोलिस स्टेशन चे ठाणेदार उमेश पाटील यांनी तपासचक्रे जलदगतीने हलवित मारेगाव पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना सूचना केल्यानंतर नितिन खांदवे यांनी तपासगती मिळविली. काही वेळातच बल्लारपुर पोलिस पथक मारेगाव येथे दाखल झाले. आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु झाला. अवघ्या २० कि. मी. अंतर असलेल्या करंजी येथून एकास तर दोघांना कारंजा जी. अकोला येथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत संशायित आरोपी सलमान मजीद खॉन, गणेश जंगमवार, विष्णु पूण सर्व राहणार बल्लारपुर यांना गजाआड करण्यात आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्व:स सोडला. परिणामी अपघातग्रस्त कार मारेगाव पोलिसात जप्त करण्यात आली आहे.


Previous Post Next Post