सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
केळापुर, (२५ ऑगस्ट) : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय करंजी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रुंझा व खैरगाव (देशमुख) या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक वर्षापासून रुग्णवाहिका नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील लोकांना रुग्णालयात येण्याकरिता मोठी काटकसर त्रास सहन करावी लागत होती. मात्र, या सर्कल मधील लोकप्रतिनिधींनी सगळ्यांचे लाडके आमदार अशोक उईके यांच्या कानावर टाकली असता डॉ. आमदार अशोक उईके यांनी विलंब न करता, या बाबीची दखल घेऊन दि.२४-४-२०२१ व दि.६-५-२०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली.
रुग्णालय करंजी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रुंझा व खैरगाव (देशमुख) ग्रामीण रुग्णालय व या भागातील परिसर,आदिवासी, अती मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचा परिसर व गोरगरीब वर्ग राहत असल्यामुळे या परिसरातील लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी कुठल्याही सोयीसुविधा नसल्याने येथे खनिज विकास निधी मधून रुग्णवाहिका मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करून रुग्णवाहिका लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता आमदार उईके सातत्याने मागणी लावून होते, अखेर आमदार डॉ. अशोक उईके यांच्या प्रयत्नाला यश आले व खैरगाव (देशमुख) प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रूग्णवाहीका मिळाली. १५ ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत रुग्णालय करंजी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रुंझा व खैरगाव (देशमुख) प्राथमिक आरोग्य केंद्राला नविन रूग्णवाहीका मंजुर झाली असुन, दि. २३ ऑगस्ट रोजी रूग्णवाहीका तयार झाल्याची माहीती आरोग्य विभाग जिल्हा परिषद मिळाली. त्यामुळे खैरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील रुग्णांच्या सेवेत नवीन रूग्णवाहीका दाखल होत असल्याने या परिसरातील लोकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.