सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२६ ऑगस्ट) : दिनांक २४ ऑगस्ट २०२१ मंगळवार ला मौजे चिंचोली येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. सदर कार्यक्रम महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी महागाव, कृषी अधिकारी पं स महागांव व संस्कार कृषी केंद्र फुलसावंगी, धानुका ऍग्रीटेक व टाटा रॅलीज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतराव पाटील (सरपंच चिंचोली), हे प्रमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग राठोड पोलीस पाटील व कृषी सहाय्यक एन जे आडे हे होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन समाधान गावंडे (टाटा रॅलीज कंपनी) व नलावडे (धानुका एग्रीटेक लि) यांनी केले.
या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शवली असून उषाताई राठोड सरपंच, जयंतराव पाटील पोलीस पाटील राजुसिंग राठोड, प्रवीण राजेंद्र पांडे, व आदींनी सहभाग होता.