Page

पुसद येथे राणी लक्ष्मीबाई महिला प्रशिक्षण केंद्र सुरु


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२६ ऑगस्ट) : राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था हिवरा (स.) ता.महागाव जि. यवतमाळ या संस्थेच्या वतीने दि.२३ऑगस्ट २१ रोजी देशमुख नगर, पुसद येथे महिला प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन भाजपा- किसान मोर्चाचे प. विदर्भ संपर्क प्रमुख महेश नाईक यांच्या शूभहस्ते करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम जिजाऊ माँ साहेब व सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन महेश नाईक व संस्थेच्या संचालिका सविता भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महेश नाईक यांच्या हस्ते द्विप प्रज्वलनं करून या प्रशिक्षण केंद्राची रीतसर सुरुवात करण्यात आली. यावेळी राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका सविता भोकरे यांनी या प्रशिक्षण केंद्रविषयी सविस्तर माहिती दिली. हे प्रशिक्षण केंद्र राज्य शासन नोंदणीकृत असून यात महिलांना अंगणवाडी सेविका (मॉनटेसरी), शिवण क्लास, ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून महिलांना स्वतः चा रोजगार उभारता येणार असून महिलांना साठी असलेल्या विविध शासकीय योजनाचा लाभ घेता येणार असल्याची माहिती सविता भोकरे यांनी दिली. तर महेश नाईक यांनी आपल्या उदघाटनपर निवेदनात राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशी संस्था, हिवरा (सं) या संस्थेने पुसद येथे महिलांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थे आभार मानले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंदजी मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना सुरु केल्या असून, याचा लाभ आपण घेतला पाहिजे, असे प्रतिपादन नाईक यांनी केले.

केंद्र सरकार च्या मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग योंजना च्या माध्यमातून महिलांना व्यक्तिगत व सामूहिक रित्याही उद्योग उभारता येईल. तसेच अशा प्रशिक्षणातुन निश्चितच स्वतःचा रोजगार उभारून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त महिलांणी घेऊन स्वयं रोजगार उभारावा असे आव्हान महेश नाईक यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीते करिता संस्थेस शुभेच्छा देऊन सर्वतोपारी सहकार्य करण्याची गवाही महेश नाईक यांनी दिली. यावेळी संस्थेने शिवण क्लास करिता वर्षा जाधव तर ब्युटी पार्लर करिता कल्पना वाघमारे यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या वेळी पुष्पा उपासे, संध्या सरकाटे, वैशाली वानखेडे, संगीता ढगे, मंजुषा कांबळे, स्नेहा चव्हाण, मीरा गव्हाणकर, शीतल आडे, संगीता बनकर,स्वेता देशमुख, अन्नपूर्णा धबाले, निता चव्हाण, दीपाली साईसुंदर आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कल्पनाताई वाघमारे यांनी तर आभार वर्षाताई जाधव यांनी केले.