Page

वानोळा ताडंयात तिज उत्सव उत्सहात साजरा

सह्याद्री न्यूज | वासुदेव राठोड 
किनवट, (२४ ऑगस्ट) : तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच. बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच तीज. मुळात बंजारा समाजातील तीज उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरुवात होते. याच पार्श्व भूमीवर वानोळा येथे तिज उत्सव साजरा करण्यात आला.

या तिज उत्सव पर्वावर वधु वर परिचय मेळावा आयोजन करण्यात आला असून, यावेळी समाजातील वधू वरांनी आपला परिचय देऊन संस्कृतीचे जतन करत तिज हा उत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी नायक विजय राठोड, कारभारी कृष्णाकुमार राठोड, हेमसिंग चव्हाण, संतराम राठोड, शंकर आडे, तारासिंग चव्हाण, फुलसिंग राठोड, वाय एच जाधव, गोविंद चव्हाण, उपसरपंंच सुरेश राठोड, अशोक राठोड (डिलर), मधूकर राठोड, चंदू चव्हाण, संजय चव्हाण, वल्लभ पवार, अभिजित राठोड (माजी उपसरपंच), अमोल राठोड, दुधराम राठोड,माधव नाईक,राजू राठोड,वासुदेव राठोड (सं.अ.गोर केसुला ग्रुप म.रा) इत्यादी उपस्थिती होते.

तिज उत्सवा करिता विशेष योगदान बळीराम राठोड, आनंदराव राठोड, सुनिल चव्हाण, बंडू पवार आदींनी घेतले.