टॉप बातम्या

चारगाव शिरपूर कोरपना रस्त्याची दुरावस्था

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (१४ जुलै) : चारगाव शिरपूर कोरपना रस्ता गेले दोन वर्षांपासून उखडला आहे. रस्त्याला पूर्णता: खड्डे पडले असून, रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता हेच कळत नाही. या रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कुठे कोणता खड्डा कर्दनकाळ ठरेलं हे सांगता येत नाही.

सदर मार्गांवर अपघात होऊन बऱ्याच लोकांना जीव ही  गमावावा लागला आहे. हा रस्ता ठिकठिकाणी रखडला असून, पावलो पावली मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रवास करताना चारचाकी सोडा, दुचाकी सुद्धा चालवणे त्रासदायक आहे. अजून किती त्रास सहन करावा लागेल. असा संताप व्यक्त होत आहे. संबंधित बांधकाम विभागाला कधी जाग येईल की नाही असा प्रश्न पडत आहे. सदर रस्ता बनवणे सोडा, रस्त्याची साधी डागडुगी सुद्धा गेले दोन झालेली नाही.
प्रवाशी व स्थानिक लोकं या जीवघेण्या रस्त्याला कंटाळले असून, कोणाचा कधी अपघातात जीव जाईल हे सांगता येत नाही. परिणामी हा रस्ता त्वरित सुधारावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

 
Previous Post Next Post