टॉप बातम्या

महत्वाचे अपडेट: खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण !

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (३ जुलै) : केंद्रसरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केली असून, तेल्याच्या आयातीवरील शुक्ल कमी केल्याने - खाद्यतेलाच्या किमती कमी होत आहेत. त्यानुसार आता सूर्यफूल व सोयाबीन तेलाच्या दरात २० ते २२ रुपयांची घसरण झाली आहे असे तेल उत्पादक व व्यापारी यांनी सांगितले. 

कसे आहेत नवीन दर ?

गेल्या वर्षी मार्चपूर्वी ९० रुपये प्रतिकिलो असलेल्या - सोयाबीन तेलाचे सर्वाधिक दर १६६ रुपये प्रतिकिलो झाले होते, ते कमी होऊन सध्या १४२ रुपये प्रतिकिलो झाले. त्याचप्रमाणे खाद्यतेल म्हणून वापरात असलेले - सूर्यफुल तेलाचे दर १८५ रुपये प्रतिकिलो झाले होते, मात्र हे दर कमी होऊन - सध्या १६५ रुपये प्रतिकिलो झाले आहे.

तसेच शेंगदाणा तेल मागीलवर्षी १०५ ते ११० रुपये प्रतिकिलो होते, मात्र या वर्षभरात एकूण ७५ रुपयांची वाढ होऊन - हे तेल १८० ते १८५ रुपये प्रतिकिलो आहे. त्याचबरोबर पामतेलाचे दर वाढून १५० ते १५५ रुपये प्रतिकिलो होते, त्यानुसार आता कमी होऊन १२८ रुपये प्रतिकिलो आहेत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();