सह्याद्री न्यूज | राजविलास
यवतमाळ, (४ जुलै) : राज्य सरकार राज्यात साडेतीन हजार प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरणार आहे.
केंद्र सरकारच्या आरक्षणानंतरच राज्यात प्राध्यापकांची पदभरती करावी,अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. पूर्वी एकल पद्धतीचे आरक्षण होते. केंद्र सरकारने विद्यपीठ आणि महाविद्यालयाचा समावेश केला आहे.
या संदर्भात केंद्र सरकारने कायदा पारित केला आहे. तो राज्यात लागू करण्यात यावा. अशी मागणी माजी खासदार राठोड यांनी केली आहे.