सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (३ जुलै) : तालुका भाटसांगवी येथील रहिवासी असणारे आत्माराम नामदेव बोरवडे (५१) आज दि.३ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बोरवडे हे माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे महावितर कंपनीत वरीष्ठ ऑपरेटर म्हणून कार्यान्वित होते.
गेली काही दिवसापासून तब्बेतीत अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, परंतु आज सकाळी त्यांचा उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने भाटसांगवी परिसरात शोककळा पसरली.
बोरवाडे यांचा मनमिळाऊ स्वभाव असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना परिसरात सर्वांचे परिचित होते. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली,आई-वडील, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.