सह्याद्री न्यूज | संतोष पेंदोर
नांदेपेरा, (३ जुलै) : वणी तालुक्यातील सोनापूर शेत शिवारातील विद्युत पोल झुकलेल्या अवस्थेत असून ते केव्हा पडून एखाद्या जीव घेईल हे सांगता येत नाही. याबाबत वारंवार लेखी तोंडी सांगून ही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचे येथील शेतकरी गुंजेकर व देसाई यांनी सांगितले.
देसाई यांनी २०१८ मध्ये महावितरण ला याबाबत तक्रार केली होती. परंतु त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत तेव्हापासून दुर्लक्ष केल्या जात आहे अशी येथील गावाकऱ्यांची तक्रार आहे.
तसेच मंगल गुंजेकार यांच्या ही शेतात विद्युत पोल झुकलेले आहे. त्यांनी ही २०२१ मध्ये एमएसीबी ला कम्प्लेंट केली. त्यांनी यांना लेखी तोंडी कळविले की माझ्या शेतात आपल्या विद्युत तारेचे पोल झुकलेले आहे ते केव्हा ही पडू शकतात, शिवाय जीवित हानी होऊ शकते. त्यावर संबधीतानी म्हटले की पोल उभे करावे लागतात त्यासाठी लाईट बंद करावी लागते, त्यानंतर लाईट बंद केली. लाईट पंधरा दिवस बंद ठेवून सुद्धा पोल उभे केले नाही. पंधरा दिवस उलटून पोल उभे केले नाही. सध्या शेतीचा हंगाम सुरु असून वरून राजा दडी मारून बसल्याने आता पाण्याची शेतमालाला नितांत गरज आहे. विज पुरवठा बंद असून मात्र, शेतकऱ्याकडे कोणीच का?लक्ष देत नाहीत. असे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर पोल उभे करून विद्युत पुरवठा सुरु करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.