टॉप बातम्या

मुख्यमंत्री ठाकरे यांना ई-मेल द्वारे शेतकऱ्यांचे निवेदन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (ता.५ जुलै) : शेतकऱ्यांना कर्ज देण्यास राजूर येथील महाराष्ट्र बँक दिरंगाई करीत असून अर्जदारांना व्यवस्थापक धुळकावून लावतात असा आरोप मार्डी परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या चार महिन्यापासून बँक व्यवस्थापक 'तारीख पे तारीख' देतात. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व आमदार बोदकुरवार यांना देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी मा. मुख्यमंत्री यांना आपली व्यथा ई-मेल द्वारे कळवली आहे.

मारेगाव तालुक्यातील बरेच गावे राजूर येथील महाराष्ट्र बँकेला जोडले गेली आहेत. परंतु ही बँक शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी नाहक अडवणूक करते. अशी तक्रार तहसीलदार व आमदार यांचे केली असून, या परिसरातील अनेक शेतकरी यावर्षी कर्जापासून वंचित राहिले आहे.      (आमदार बोदकुरवार यांना निवेदन देताना)

असा आरोप निवेदनातून शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी भास्कर राऊत, महादेव ताजने, नत्थू गेडाम, रामचंद्र खिरटकार, माया राऊत, अशोक धोबे, रंजना खिरटकार, तृप्ती बोबडे आदींनी उपस्थिती होती.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();