सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (५ जुलै) : गुटखा,तंबाखू,बिडी,सिगारेट या घातक व्यसनापैकी अती घातक व्यसन म्हणजे ते दारू चे व्यसन हे 'व्यसन' एखाद्या परिवारातील लोकांना लागले की, त्या परिवाराचे काय हाल असतात हे आपण बघून राहिलो आहे आणि आपल्या पैकी ९०% लोकांनी या व्यसनापासून जे हाल आपले व आपल्या परिवाराचे झाले हे आपण प्रत्यक्ष भोगले,बघितले आहे.
आज आपण भेटी घाटी या विशेष कार्यक्रम दरम्यान एकत्र आलो. कोरोना महामारीच्या या दोन वर्षाच्या काळात आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलो नव्हतो. या काळातही आपण प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटनेचे लोक समाज दारू व्यसन मुक्त करण्याकरिता धडपडत आहे.आज आपल्या पैकी कुणी १५ वर्ष कुणी १० वर्ष कुणी ५ वर्ष कुणी १,२ वर्ष दारू व्यसन सोडून कित्येक लोक इथे उपस्थित आहे.
यातील काही लोक जस आपण या संघटनेच्या माध्यमातून दारू व्यसन मुक्त झालो. तसे आपले गाव शेजारी आपले लोक आपला समाज हा दारू व्यसन मुक्त झाला पाहिजे यासाठी आपण झटत आहे कार्य करत आहे. आपण सर्व मिळून प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या माध्यमातून या चंद्रपूर जिल्ह्यातील असा समाज घडवायचा आहे की, आपण दारू व्यसन मुक्त केलेला व्यक्ती हा पुन्हा दारू पिणार नाही आणि नाविन व्यक्तीला दारूचे व्यसन लागणार नाही. कुणी कितीही आमिष दाखविले किंवा घराच्या समोर दारूची दुकान असली तरी आपला व्यक्ती या व्यसनाच्या आहारी जाणार नाही आणि कालांतराने घरासमोर ची दारूची दुकाने आपोआप बंद होणार असा समाज घडवा असे ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी घाटी कार्यक्रमा अंतर्गत बोलत होते. या कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना माक्सचे वाटप करण्यात आले तसेच समाज दारू व्यसन मुक्त करण्याकरिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा संघटनेच्या वतीने हार टाकून स्वागत करण्यात आले.
यावेळी प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्त संघटना जिल्हा चंद्रपूर चे श्री.बालाजी बोरकुटे, जिल्हा संघटक श्री.लक्षमीकांत धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.दिंगाबर वासेकर, तालुका अधक्ष श्री.भाऊराव ठाकरे, श्री.भालचंद्र रोहनकर, श्री.मारोती वाकुलकर, श्री.साईनाथ कुनघाटकर, श्री. नामदेव राऊत, श्री.दुधराम चरडुकेश्री, भाऊजी चाफडे, श्री.मंगेश चाकलपलीवार, श्री.गजानन रामटेके इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.