सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (५ जुलै) : तालुक्यातील टाकरखेडा येथील महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी दि.३ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
छबुताई बाबाराव बोढाले रा. टाकरखेडा असे मृतक महिलेचे नाव आहे. शेतात काम करत असताना बोढाले ताईला संर्पदंशाने झाल्यानंतर मारेगाव ग्रामीण रूग्णालय येथे दाखल करून प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्लाने पुढील उपचारासाठी वणी येथील खाजगी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान छबु बोढाले यांचे निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे दोन विवाहित मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.