टॉप बातम्या

सिनेस्टाइल पाठलाग करून जनावरांची तस्करी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
केळापूर, (४ जुलै) : नागपूर हैद्राबाद व्हाया पांढरकवडा मार्गाने मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी या मार्गावर गुप्त हेरांची संख्या वाढविली आहे. या राज्य महामार्गावर पोलिसांनी ठिकठिकाणी खबरी तयार केले आहेत. खबऱ्यांना प्रत्येक मालवाहू वाहनांवर जातीने लक्ष ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे. या राज्य महामार्गावरील एका खबऱ्याने पांढरकवडा पोलिसांना करंजी पांढरकवडा मार्गे हैद्राबाद येथे एका ट्रकमध्ये गोवंश जनावरे कत्तली करिता नेली जात असल्याची माहिती दिली. माहिती मिळतातच सपोनि हेमराज कोळी यांनी पोलिस पथकासह खाजगी वाहनाने नागपूर हैद्राबाद मार्गावर गस्त घालत केळापूर टोल नाक्याजवळ सापळा रचून अदिलाबादकडे जाणाऱ्या वाहनांवर बारीक नजर ठेवली. पांढरकवड्याकडून एक दहा चाकी ट्रक भरधाव अदिलाबादच्या दिशेने येतांना पोलिसांना जातांना दिसला. पोलिसांनी या ट्रक ड्रायव्हरला इशारा करून ट्रक थांबविण्यास सांगितले, पण पोलिसांना पाहून ट्रक डायव्हरने ट्रकचा वेग आणखीच वाढवत सुसाट ट्रक पळविला. पोलिसांनीही त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. ट्रक डायव्हर नागमोडी वळणासारखा ट्रक चालवून पोलिसांना ओव्हरटेक करण्यापासून रोखत होता. पोलिसांना गुंगारा देण्याचा ट्रक ड्रायव्हरने पुरेपूर प्रयत्न केला. पण पिंपळखुटी चेकपोस्टवर सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी अखेर ट्रक पकडलाच. ट्रक ड्रायवरसह दोघे जण ट्रकमधून उड्या मारून पळाले. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये एकमेकांच्या पायाला बांधून अतिशय निर्दयीपणे कोंबून असलेली गोवंश जनावरे आढळली. पोलिसांनी रस्त्यालगतच्या परिसरात आरोपींचा शोध घेतला असता तीनही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर जनावरांची तस्करी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही काल ३ जुलैला सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
नागपूर वरून पांढरकवडा मार्गे हैद्राबाद येथे मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी केली जाते. कंटेनर सारख्या वाहनांमध्ये सुद्धा गोवंश जनावरे भरून कत्तली करिता नेली जातात. अशाच एका गोवंश जनावरांना निर्दयीपणे कोंबून कत्तली करिता घेऊन जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. सपोनि हेमराज कोळी यांना गुप्त हेराकडून माहिती मिळाली की, एका दहा चाकी कंटेनमध्ये गोवंश जनावरे भरून हैद्राबाद येथे कत्तली करिता नेली जात आहे. सपोनि अमोल कोळी यांनी पोउपनि निलेश गायकवाड, पो.ना. महेश नाईक, पो.ना. राजेश सुरोशे, पो.कॉ. सुरज गजभिये यांचे पथक तयार करून खाजगी वाहनाने कंटेनर ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून आदिलाबाद रोडवरील पिंपळखुटी चेकपोस्ट जवळ अखेर सुसाट ट्रक पळवतांना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक डिव्हायडरला भिडला. मागवून येणाऱ्या पोलिसांना पाहून ट्रक ड्रायव्हरसह दोघे जण ट्रक मधून उड्या मारून पळाले. पोलिसांनी रस्त्यालगतच्या परिसरात त्यांचा शोध घेऊन तिघाही आरोपींना अटक केली. पोलिसांनी MH ४० BG ६४७८ या ट्रकसह ५६ गोवंश जनावरे ताब्यात घेतली. तसेच राकेश पुनमचंद जयस्वाल (३१) रा. बाळगंगा इंदोर (म.प्र.), धीरज अनिल रेड्डी ९३३० रा. राणी दुर्गावती चौक, नागपूर, समीर खान शब्बीर खान (३३) रा. कामठी, नागपूर या तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ४२९, २७९, ३४ सहकलम ११(१)(घ)(ड)(च)(ज)(ट)(झ) व मूक जनावरांना निर्दयीपणे कोंबून त्यांना क्रूरपणे वागविण्याच्या प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या धाडीत ट्रक कंटेनर किंमत २२ लाख रुपये, ५६ गोवंश जनावरे किंमत ६ लाख ७२ हजार रुपये असा एकूण २८ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
सादर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि हेमराज कोळी, पोउपनि निलेश गायकवाड, पो.ना. महेश नाईक, राजेश सुरोशे, पोकॉ. सुरज गजभिये यांनी केली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();