टॉप बातम्या

सम्राट अशोक नगर येथील युवकाने घेतला गळफास

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (६ जुलै) : शहरातील सम्राट अशोक नगरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ६ जुलैला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अविनाश अशोक सातपुते (३८) असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घराच्या आड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो कुटुंबियांना आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. 
वणी शहरातील सम्राट नगर येथे वास्तव्यास असलेल्या अविनाश सातपुते याचा फळ विक्रीचा व्यवसाय होता. त्याला दारूचे व्यसन असल्याचे समजते. फळविक्रीचा व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असतांना आज अचानक त्याने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला आहे. त्याच्या या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्याच्या मागे पत्नी, सहा वर्षाचा मुलगा व वृद्ध आई वडील असा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिस आत्महत्येचे कारण जाणून घेण्याच्या दृष्टीने तपास करीत आहेत.
Previous Post Next Post