गुजगोष्टी संगे...
हितगुज....
प्रणयात गुंतलेले ते तरुण जोडपे आपापसात गुजगोष्टी करीत होते...
तिच्या आरस्पानी सौंदर्याला पाहून
तो तिला म्हणाला, "तुझ्यासाठी मी आभाळातले चंद्र तारे तोडून आणेन..."
पावलानकडे वळवलेली आपली नजर स्थिर ठेवत ती म्हणाली, "असे करण्याचे दु:साहस मी तुला कधीच सांगणार नाही..."
तो म्हणाला, "का..?"
ती म्हणाली, "ते कसं शक्य आहे..."
तो म्हणाला, "मी शक्य करून दाखवेन...
ती म्हणाली, "जगाला अंधारात टाकून मला प्रेम नाही करायचे...."
आता त्याची बोलतीच बंद झाली ....
.
.
.
.
.
.
थोडावेळ नि:स्तब्धता पसरली...
अर्धांगिनीच्या होकारा शिवाय पुरुष परिपूर्ण नाही....
'गुजगोष्टीचे "हितगुज" आता उमलू लागले होते...!!!'
(सदरहू माझ्या सर्वच लघुकथा वास्तवाचे दर्शन व भावनात्मकता यांचे चित्रण करतात त्या काल्पनिक असून कोणाचीही भावनिकता दुखावणे हा हेतू या पाठीमागे नाही जर अशा पद्धतीचा संबंध कोणाच्या जीवनात आला असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
- प्रा. उदय सुपेकर
वडगाव बुद्रुक पुणे
संपर्क- ८०८७१६१६९९