टॉप बातम्या

जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

                        (संग्रहीत फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (६ जुलै) : अतिशय शुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. एकाने दुसऱ्याला अश्लील शब्दात जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिस स्टेशनला प्राप्त झाली आहे. तालुक्यातील पेटूर येथे शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादात जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आल्याने शिवीगाळ करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तालुक्यातील पेटूर या गावात एकमेकांच्या घराशेजारी राहणाऱ्या कुडमेथे व लांबट कुटुंबात ११ जूनला शुल्लक कारणावरून वाद झाला. याबाबत सुनंदा महादेव कुडमेथे (४०) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून सुनंदा महादेव कुडमेथे या आपल्या परिवारासोबत पेटूर येथे राहतात. दोघेही पती पत्नी मजुरी करतात. त्यांच्या घरा शेजारी दिलीप दत्तू लांबट (५०) हे कुटुंबासह राहतात. सुनंदा कुडमेथे यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने त्यांच्या घरासमोर रेती पडली होती. १० जूनला पाऊस आल्याने रेतीच्या ढिगाऱ्याला पाणी अडून दिलीप लांबट यांच्या घरात शिरले. याबाबत त्यांनी गावच्या सरपंचाकडे तक्रार केल्याने सरपंच प्रवीण झाडे यांनी सदर ठिकाणावरून रेती उचलण्यास सांगितले. त्यानंतर सुनंदा कुडमेथे यांनी रेती उचलली देखील. पण ११ जूनला दिलीप लांबट हा दारू पिऊन आला, व जोरजोराने ओरडून अश्लील शब्दात शिवीगाळ करू लागला. तुमच्या रेतीच्या ढिगाऱ्यामुळे पाणी अडून आमच्या घरात शिरले, तुम्हाला सोडणार नाही असे बरळू लागला. सुनंदा कुडमेथे यांच्या मुलाने शिव्या का देतोस असे विचारले असता दिलीप लांबट सरळ त्याच्या अंगावर चालून आला. दिलीप लांबट यांची पत्नी माया दिलीप लांबट व मुलेही कुडमेथे कुटुंबियांच्या अंगावर धावून आले. जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. माया लांबट यांनी सुनंदा कुडमेथे यांचे केस पकडून मारहाण केली. दिलीप लांबट व आशिष लांबट यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सचिन लांबट याने पोलिसांची गाडी बोलावून शिव्या देतच ते गाडीमध्ये बसून पोलिस स्टेशनला आले. सुनंदा महादेव कुडमेथे यांनीही पोलिस स्टेशनला येऊन लांबट कुटुंबाकडून झालेली मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी भादंवि च्या कलम २९४, ३२३, ५०६ व ३(१)(R), ३(१)(S), ३(२)(VA) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.
Previous Post Next Post