सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : नुकतेच ठाण्यात दोनशे वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन संदेश देणारे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांची हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज (ता. 23) सकाळी दहा वाजता त्यांना हृदयात अस्वस्थ वाटू लागले,त्यांना तातडीने वणी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेसरकर हे गत दोन महिन्यापूर्वी मारेगाव पोलीस स्टेशनला रुजू झाले होते. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत, न्यायिक भूमिका व त्यांचा मनमिळाऊ सुस्वभाव हा येथील काही दिवसाचाच राहिला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलीस दल सह वणी उपविभागात पोलीस जवानांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस प्रशासनात शोककळा पसरली असून पोलीस निरीक्षक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.