सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (ता.१८) : येथील प्रभाग क्रमांक चार मध्ये वास्तव्य करीत असलेल्या रोजमजोरी जीवन जागणाऱ्या प्रवीण पुरुषोतम परसूटकर (३०) या अविवाहित युवकाने आपल्या राहत्या घरी इलेक्ट्रिक वायराने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना आज दिनांक १८ जून च्या रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी घडली, या ६ वर्षापूर्वी त्याच्या वडिलाने आपल्या राहत्या घरीच गळफास घरून जीवन यात्रा संपवली होती, हालाकीच्या परिस्थितीतील जीवन जागणाऱ्य कुटुंबातील पती आणि त्या पाटोपात मुलांचेही छत्र हरवल्याने निरागस आई समोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.