सह्याद्री न्यूज | योगेश तेजे
कायर, (शिरपूर-ता.१६) : कायर येथे परवानाधारक दारू भट्टी समोर परसोडा येथील युवकाला दगडाने ठेचून मारहाण करण्यात आली. ज्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले असून आरोपीस मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली.
पुरषोत्तम मुर्लीधर बोर्डे (३६) रा.परसोडा हा युवक रविवार दि.१३ जून ला सायंकाळी कायर येथील दारूभट्टी समोर ऊभा असता वेळी कायर गावातील आरोपी दिपक रामलू शिंगिडवार (२८) तेथे आला आणि आरोपीने पुरषोत्तम या युवकाकडे दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यावेळीं पुरषोत्तमने पैसे देण्यास नकार दिला. त्या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला.त्यावेळी पुरषोत्तम यास आरोपीने खाली पाडून मारहाण केली व डोक्यावर दगडाने प्रहार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमीला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, पुरषोत्तम या युवकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्या जात आहे.
या घटनेची तक्रार पुरषोत्तम मुर्लीधर बोर्डे यांच्या आई कांताबाई बोर्डे यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या तक्रारी वरून आरोपी विरूद्ध भांदवी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.