Top News

नियुक्त प्रतिनिधीने नोकरी सोडल्यास त्यांनी केलेला पत्रव्यवहार अमान्य.महाठग विमल शहाचा एमआयडीसी प्रशासनासोबत छुपा डाव(?)


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (ता.१६ जून) : आकृती हब टावून विकासक विमल शहा ठेवलेल्या प्रतिनिधीने नोकरी सोडल्यास एमआयडीसी प्रशासनसोबत केलेला "तो" पत्रव्यवहार अमान्य करतो, ही फार मोठी फसवणूक असून नियोजित छुपा डाव असल्याचे डॉ. माकणीकर म्हटले आहे.

आकृती हब टावून विकासक महाठग विमल शाह ने महादलाल मुरजी कांजी पटेल यांच्या मदतीने नियोजित डाव रचून नोकरीस ठेवलेल्या प्रतिनिधीने एमआयडीसी प्रशासनासोबत केलेला इ-मेल व पत्रव्यवहार जाणिवपूर्वक अमान्य करून शासन व एमआयडीसी प्रशासनाची दिशाभूल केली आहे.

तत्कालीन प्रतिनिधीने केलेला पत्रव्यवहार खोटा असल्याचे सांगून प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचे डॉ. माकणीकर यांनी सांगितले असून आर टी आय च्या माध्यमातून ते स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे.

आरटीआय च्या माध्यमातून मागविलेल्या माहीती मध्ये मा. कार्यकारी अभियंता ठाणे यांनी सध्याचे प्रतिनिधी केवल वालभिंया यांचे नावाचे अधिकृत पत्र नोटरी करून मागवले आहे. सदरचे पत्र जावक क्रमांक आयएफएमएस/काअ/ठाणे-१/डी-२३५०१/२०२०, दि ८ दिसेम्बर २०२० रोजी देवुन सुद्धा चोर मुजोर विकासकांने पत्राला केराची टोपली दाखवली आहे.

या चोरांना कुणाचा राजकीय पाठिंबा आहे, या परप्रांतीयांची महाराष्ट्रात येऊन भूमिपुत्रांना धमकावण्याची व त्यांच्या जमिनी बळकावण्याची हिम्मत येते कशी(?) याचा छडा लावणार असून,या दोन गुज्जू चोरांना गुजरात पळायला कमी पडेल असा पाठलाग करणार असल्याचेही डॉ. माकणीकर म्हणाले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी विमल शहा व मुरजी पटेल यांचे वर ४२० अंनव्ये गुन्हा नोंद करावा व प्रकल्पात चौकशी व्हावी व भ्रष्ट अधिकाऱ्यांची वंशावळ संपत्ती ची चौकशी व्हावी असा आग्रह धरला आहे.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, राज्य महासचिव श्रावण गायकवाड, युवा राष्ट्रीय सचिव भाई विजय चव्हाण, बंजारा सेल प्रदेशाध्यक्ष भाई शिवा राठोड, सचिन भुटकर, यांच्या उपस्थितीत शेकडो च्या संख्येने मोर्चा आंदोलन करणार असल्याचे डॉ. माकणीकर यांनी सांगितले.
Previous Post Next Post