सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (ता.१९) : आज दिनांक १९/०६/२०२१ रोजी वनविभाग पांढरकवडा व पोलीस उपविभाग वणी यांचे संयुक्त कारवाई मध्ये दिनांक २३/०३/२०२१ रोजी मारेगाव वनपरिक्षेत्रात व दिनांक २५/०४/२०२१ रोजी मुकुटबन वनपरिक्षेत्रात घडलेल्या वाघ शिकार प्रकरणी वन्यजीव (स्वरक्षण) अधिनियम१९७२ अन्वये आरोपीना अटक करण्यात आली. सदर कारवाई मध्ये मुकुटबंन वनपरिक्षेत्रातील शिकार प्रकारणातील आरोपी १)नागोराव भास्कर टेकाम, २)सोनू भवानी टेकाम, ३)गोली रामा टेकाम, ४)बोनू तुकाराम टेकाम, ५)तुकाराम भवानी टेकाम सर्व रा वरपोड ता.झरी जामणी जिल्हा यवतमाळ यांना वरपोड येथून अटक करण्यात आली.
तसेच मारेगाव वनपरिक्षेत्रातील शिकार प्रकरणातील संशयीत आरोपी १)दौलत भीमा मडावी, २)मोतीराम भितु आत्राम, ३)प्रभाकर महादेव मडावी सर्व रा.येसापूर ता.झरी जिल्हा यवतमाळ यांना येसापूर येथून अटक करण्यात आली. मारेगाव वाघ शिकार प्रकरणातील आरोपीची घराची झडती घेतली असता वन्यप्राण्यांचे मांस तसेच शिकार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीची वैघकीय तपासणी करून मा.न्यायालयापुढे हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदरची कार्यवाही श्री.किरण जगताप .उपवनसंरक्षक पांढरकवडा वनविभाग पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.एस.आर.दुमारे, सहा.वनसंरक्षण (जंकास व कॅम्पा) पांढरकवडा श्री.विक्रात खाडे, श्री.विजय वारे, श्री.माधव आडे, श्री.रणजीत जाधव, कु. संगीता कोकणे, श्री.तुळशीराम साळूके, श्री.सुनील मेहरे, श्री,आशिष वासनिक, श्री.गेडाम,श्री.सोडवले,सर्व वनपरिक्षक अधिकारी व श्री.सोनूणे पोलीस निरीक्षक मुकुटबन, कु.संगीता हेलांडे सहा, पोलीस निरीक्षक पाटण तसेच इतर पोलीस व वन अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली.