Page

खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जनावरे राखणाऱ्या गुरख्यांना रेनकोट व मास्क वाटप


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वणी, (ता.१९) : कोरोना काळात संपुर्ण जनतेवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्येक व्यक्ती हा कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात भटकंती करीत आहे. त्यामध्ये गाई-म्हशी चारुण उदरनिर्वाह करणारे ,गोरगरिबांना दोन वेळच्या पोटाची भाकर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या गुराख्यांना आपला परिवार पोसावा की स्वतःच्या बचावा साठी रेनकोट घ्यावी . पावसाळ्याची चाहुल लागताच, गुराख्यांना मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. ह्याच गोष्टीची जान ठेऊन आज  खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील गुराख्यांना युवक काँग्रेसच्या वतीने शेकडो रेनकोट व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखलगांव येथे गुरे राखणाऱ्या नागरीकांना रेनकोट व मास्क चे वाटप करुन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमांला प्रमुख उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विवेक मांडवकर होते.

यावेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप खेकारे, निलेश दखने, किशोर उईके, गौरव कुमरे, प्रयास कुमरे, गणेश ढुमणे, सुरज ठुमणे, शुभम जरीले व भारत खैरे उपस्थित होते.