सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (ता.१९) : सध्या पावसाळा सुरु झाला असून बहुतांश तालुक्यातील नाले ओढे भरून वाहू निघाले. यामुळे कायर ते पढारपुर या रस्त्या मध्ये येणाऱ्या विदर्भ नदीत पुराण अडकून पडल्याने प्रवास करण्यास अडथळा होतोय शिवाय विदर्भ नदीची साफसफाई करून खोलीकरण वाढवण्यात यावी.कायर ते पठारपुर सिंधिवाढोणा या मार्गांवर येणारी नदी विदर्भ नदी म्हणून ओळखले जाते, त्या नदीमध्ये पावसामुळे पुराण कचरा खुप अटकलेला आहे. तो साफ करणे गरजेचे आहे असे, यामार्गाने जाणारे नागरिक सांगतात.
येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना पावसामध्ये भितीचे वातावरण असते, परिणामी त्या नदीची लांबी करण व रूंदी खुप कमी आहेत. अशातच जर पाऊस साधारण आला तर या नदीवरून वेगाने पाणी वाहत असतात. त्यामुळे नागरीकांमध्ये पार करून जाणे जोखमीचे व भितीदायक असतात.
तूर्तास नदीचे काम करण्यात आले. तर नदीमध्ये जीव जाण्याची शक्यता कमी राहिल, मागील २०१२ ते २०१३ या काळात नदीने तीन जिव घेतले असून, आता पण त्यांची पुनरावृत्ती होऊ नये असे मत व्यक्त होत आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष घालून त्या नदी ची रुंदीकरण करण्यात यावी असे बोलल्या जाते. मात्र वाजतागायत याकडे दुर्लक्ष का होतेय, याला जिमेद्दार कोण? व या नदीकडे कुणीच का लक्ष देत नाही. असे अनेक प्रश्न अनुउत्तरीय आहेत.