टॉप बातम्या

चंद्रपूर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा!..अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : उत्कृष्ट पोलीस सेवा, व्यावसायिक कार्यक्षमता आणि कर्तव्याप्रती समर्पित भावनेच्या जोरावर चंद्रपूर पोलीस दलाने राष्ट्रीय स्तरावर गौरवाची मोहोर उमटवली आहे. चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांना वर्ष २०२५ साठीचे प्रतिष्ठेचे 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानामुळे चंद्रपूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून प्रदान करण्यात येणारा हा राष्ट्रीय सन्मान त्यांच्या उत्कृष्ट सेवा, व्यावसायिक कौशल्य, कार्यक्षमता आणि कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल घेणारा आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने चंद्रपूर जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();