सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर वणी येथे दि. 25/10/2026 , रविवार रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त औषधी वाटप आयोजित करण्यात आले आहे.
हे औषध वारंवार सर्दी,ताप,खोकला,शिंका,सतत नाक वाहणे, सायनुसायटिस, डोकेदुखी,दमा , अस्थमा, ॲलर्जी तसेच न्युमोनिया, टायफॉइड, डेंग्यू, चिकुनगुनिया,कोविड, होवून गेलेल्या प्रत्येकाला आवश्यक आहे.एकंदरीत नाक ,कान,घश्याशी संबंधित आजार, पचनसंस्था व श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांवर उपयुक्त आहे.प्रत्येक व्यक्तीची सर्दि, खोकला,दमा वेगवेगळे असणार त्यामुळे सेंटरच्या संचालिका वैद्य सुवर्णा चरपे, प्रत्येक रुग्णाचे मोफत नाडी परिक्षण करणार आहेत.याशिवाय,गरजेनुसार रुग्णांना अग्निकर्म, विद्धकर्म, नस्योपचार,व गरजुंना आठवडाभराची औषधे मोफत वाटप करण्यात येणार आहे.पुढील सहा महिने रुग्ण तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
औषधी वितरण व नाडी परिक्षण सकाळी 8.00 वाजल्यापासून तर सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. पुर्वनोंदणीसाठी 7038381553 या क्रमांकावर संपर्क साधावा.येताणा चालू व जुने औषधी कागदपत्रे सोबत आणावी.
पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्य उपस्थितीत या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वै.सुवर्णा चरपे यांनी केले आहे.

