सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच विकासपुरुष माजी आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ‘नमो युवा रन – नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता सुरू होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तथा लोकमान्य टिळक चौक, वणी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमातून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. विविध वयोगटांतील मुला-मुलींना स्पर्धेत सहभागी होता येणार असून, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
चार गटांत होणार स्पर्धा
गट-अ : १६ वर्षांखालील मुले — २.५ किलोमीटर
प्रथम — ₹५,००० व सन्मानचिन्ह
द्वितीय — ₹३,००० व सन्मानचिन्ह
तृतीय — ₹२,००० व सन्मानचिन्ह
चतुर्थ — ₹१,००० व सन्मानचिन्ह
गट-ब : १६ वर्षांखालील मुली — २.५ किलोमीटर
प्रथम — ₹५,००० व सन्मानचिन्ह
द्वितीय — ₹३,००० व सन्मानचिन्ह
तृतीय — ₹२,००० व सन्मानचिन्ह
चतुर्थ — ₹१,००० व सन्मानचिन्ह
गट-क : १६ वर्षांवरील मुले — ३.५ किलोमीटर
प्रथम — ₹५,००० व सन्मानचिन्ह
द्वितीय — ₹३,००० व सन्मानचिन्ह
तृतीय — ₹२,००० व सन्मानचिन्ह
चतुर्थ — ₹१,००० व सन्मानचिन्ह
गट-ड : १६ वर्षांवरील मुली — ३.५ किलोमीटर
प्रथम — ₹५,००० व सन्मानचिन्ह
द्वितीय — ₹३,००० व सन्मानचिन्ह
तृतीय — ₹२,००० व सन्मानचिन्ह
चतुर्थ — ₹१,००० व सन्मानचिन्ह
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य असून, आधार कार्ड बंधनकारक आहे. नाव नोंदणी दि. २५ सप्टेंबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी करता येणार आहे. स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी स्पर्धकाची राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून, स्पर्धेत वणी विधानसभा मतदारसंघातील स्पर्धकांनाच सहभाग घेता येणार आहे.
युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत ‘नशामुक्त भारत’चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
