टॉप बातम्या

उद्या ११७ वी ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा उत्साहात साजरा होणार मार्डी येथे


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : श्री गुरुदेव सेवा मंडळ, मारेगाव तालुका (जि. यवतमाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या ग्रामजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ४.३० वाजता परिसर स्वच्छतेने होणार आहे. त्यानंतर सकाळी ५ वाजता तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे अभ्यंग स्नान करण्यात येईल. सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान-चिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, डॉ. श्री. सुरज येवले हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान पालखी शोभायात्रा व मारेगाव नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.

सकाळी ११ वाजता कार्यकर्ता मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षस्थानी प्रकाश महाराज वाघ हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून गोपाल कडू उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणराव गमे, पाटील गुरुजी, पद्माकर ठाकरे, डॉ. ज्ञानेश्वर मुडे व मारोतराव ठेंगणे उपस्थित राहणार आहेत. महिला मार्गदर्शक म्हणून सौ. विजया देहेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यक्रमात ग्रामगीता जीवन विकास परीक्षा उत्कृष्टरीत्या राबविणाऱ्या केंद्र प्रमुखांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रवंदनेनंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम त्रिमूर्ती मंगल कार्यालय, माडी येथे पार पडणार असून, आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();