सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील श्री उज्वल गौरक्षण संस्था जवळ वास्तव्यास असलेले माजी सैनिक श्री बापूराव उद्धवराव केळकर यांचे आज बुधवारी दिनांक 20 ऑगस्ट ला सकाळी साडे अकरा वाजता नागपूर येथे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचं वय 81 वर्षाचे होतं.
श्री बापूराव केळकर यांनी विद्यावाचस्पती प्राचार्य राम शेवाळकर यांचे चालक म्हणून त्यांनी 25 ते 30 वर्षे सेवा दिली. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई व दोन मुले मनोज आणि महेंद्र केळकर व नातवंड कुमारी संस्कृती, मिराज व यथार्थ असा बराच मोठा परिवार आहे.
उद्या गुरुवार दिनांक 21 ऑगस्टला 11:30 वाजता वणी येथील मोक्षधाम मध्ये अंतिम संस्कार होणार आहे.