सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मुंबई : राज्यातील विविध प्रकल्पांकरिता वाळूची गरज लक्षात घेऊन वाळू वाहतुकीसाठी 24 तास परवानगी देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा विधानसभेत केली.
सध्या सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत वाळू उत्खननास परवानगी आहे. मात्र, रात्री वाळूची वाहतूक करता येत नसल्यामुळे वाहतूक क्षमतेचा उपयोग होत नव्हता आणि यामुळेच अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतूक वाढत होती.
आता या समस्येवर उपाय म्हणून सरकारने "महाखनिज पोर्टल" वरून 24 तास ई-ट्रान्सपोर्ट परमिट (ETP) घेण्याची सुविधा सुरू केली आहे.
वाहतुकीचे पारदर्शक नियोजन
• प्रत्येक वाळूघाटाचे जिओ-फेन्सिंग होणार
• घाट व मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे
• वाहने GPS यंत्रणेसह अनिवार्य
कृत्रिम वाळू धोरणाची घोषणा
• राज्यात नैसर्गिक वाळू मर्यादित असल्यामुळे सरकारने कृत्रिम वाळू धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
• प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रशर केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट
• ३ महिन्यांत 1000 केंद्रे सुरू करण्याचा मानस
• प्रत्येक केंद्रासाठी 5 एकर जमीन दिली जाणार
घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर
• घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत!
• ज्या घाटांना पर्यावरण परवानगी लागणार नाही, तिथून वाळू पुरवठा सुरूच राहणा
राज्यातील तिजोरीला बळकटी
• चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या निविदेतून 100 कोटी रॉयल्टी
• नवीन धोरणामुळे महसूल वाढणार