सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : भाजी मंडी परिसरातील शौचालया जवळ मटका अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मटक्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह 5 हजारांची रोकड हस्तगत केली. याप्रकरणी 5 जणांच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी किंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सुदाम आसोरे नापोका विशाल,पोकॉ मिथुन , पोकॉ घुगे, पोकॉ दळवे यांनी भाजी मंडी शौचालय जवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकला.
या प्रकरणी गणेश कवडु उपरे, शेख रज्जाक शेख वहाब, विठ्ठल गणपत हनुमंते, साधु आत्माराम राजगडे, अब्दुल हाफीज उर्फ टापु अब्दुल सत्तार आदी 5 जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.