सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले ज्ञानेश्वर आत्राम यांनी गोपनीय शाखेमध्ये अतिशय चांगले काम केले. ज्ञानेश्वर आत्राम यांनी बिड जिल्ह्यात सन २००७ ला पोलीस भरती होऊन सन २०१९ ला यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली व पहिले पोलीस स्टेशन दराटी मिळाले, त्यानंतर २०२० साली वणी पोलीस स्टेशन ला बदली झाली. येथे गेल्या ५ वर्षापासुन गोपनीय शाखेमध्ये काम करत होते.
ज्ञानेश्वर आत्राम यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असुन शांतप्रिय व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. वणीवरून त्यांची बदली पांढरकवडा येथे झाली. आज दिनांक ३ जुन रोजी सकाळी ९:०० वाजता देशी कट्टा मित्र परिवाराच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी राजाभाऊ पाथरडकर, भिकमचंद गोयनका, बलदेव खुंगर, वामनराव कुचनकार, वसंतराव महाकुलकार, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, संबा वाघमारे, सुरेश बन्सोड, मंगल तेलंग, भास्कर गोरे, महादेव दोडके सह देशी कट्टा मित्र परिवार सदस्य उपस्थित होते.