सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : बरीच वर्ष शिवसेनेत घालवल्यानंतर कांग्रेसचे कार्यकर्ता राहिलेले दिलीप घुमे यांनी काल ता. 1 जून ला सर्व गोतावळा मागे सारून जीवनातून कायमची निवृत्ती घेतली.दिलीप घुमे हे काँग्रेस आणि शिवसेना ह्या दोनही पक्षाशी जवळीक साधलेले कार्यकर्ता होते.
एका ट्रॅक्टर एजन्सी च्या माध्यमातून त्यांनी वणी व मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक चाहता वर्ग निर्माण केला.तीन महिण्यापुर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता,पक्षाघाताच्या झटक्यातून सावरत असतांनाच ते पडले व कमरेच्या हड्डीचे हाड मोडले,मात्र शस्त्रकीयेनंतर शरीरात इन्फेकशन झाले व औषधोपचारला प्रतिसाद देणे बंद झाले. गत तीन आठवड्यापासून ते चंद्रपूर ला एका खाजगी दवाखान्यात भरती होते.व नंतर चंद्रपूर येथीलच शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी रविवार ता. 1 जून ला सकाळी 10 वाजे दरम्यान शेवटचा स्वास घेतला. नुकतेच गत ऑगस्ट महिण्यात त्यांची पत्नी डॉ.सुषमा घुमे यांचं निधन झालं होतं.शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत वणी येथील मोक्षधाम येथे 4 वाजता त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक विवाहीत मुलगी एक मुलगा, तीन मोठे भाऊ व बहीन असा आप्तपरिवार आहे.