टॉप बातम्या

बुरांडा ते खापरी रस्त्याची झाली चाळण, उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : गावाकडे जाणारा बुरांडा ते खापरी हा एकमेव मार्ग असुन या मार्गाची चाळण झालेली आहे. बुरांडा ते खापरी हा अडीच किमीचा रस्ता असून त्यापैकी जवळपास 2 किमी अंतराच्या रस्त्याचे काम झालेले आहे. अर्धा किमीच्या रस्त्याचे काम अजून बाकी आहे. सध्या तालुक्यात पाऊस सुरु आहेत आणि त्यामुळे या मार्गांवरून वाहतूक करणे प्रवाश्याना व स्थानिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

खापरी ते बुरांडा रस्ता हा दोन वर्षा पूर्वी सतरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत. पण तो ही केवळ 2 किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात पावसाने जोर धरला असल्याने त्या पावसामुळे ह्या रस्त्याची अर्धा किमी जवळपास अतिशय दयनीय बिकट अवस्था झाली आहे, ह्या रस्त्यावर वाहन चालवीने कठीण झाले असून पायदळ चालणे सुद्धा अवघड आहे असं नागरिकांतून बोलल्या जातं.

सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून उर्वरीत अर्धा किलोमीटरचा रस्ता तातडीने पूर्ण करण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिकांची आहे.
Previous Post Next Post