टॉप बातम्या

तर... भाजपाचा झेंडा यंदा फडकवू- अ‍ॅड. प्रफुल चौहान


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : भारतीय जनता पार्टी,च्या वतीने संकल्प ते सिद्धी कार्यक्रम देश, राज्य व जिल्हा स्तरावर राबविण्यात आला, या कार्यक्रमाची सांगता वसंत जिनिंग हॉल येथील आयोजित कार्यक्रमात करण्यात आली.

या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चौहान यांचे वणी शहरात प्रथमच आगमनानिमित्त त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आले. तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचाही सत्कार केला. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती,यावेळी मोदी सरकार चे 11 वर्ष यावर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चौहान यांनी प्रोटोकॉल नुसार माहिती दिली. परिषदेच्या शेवटी आम्ही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ह्या युती झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर लढू, आमचे सिस्टीम रेडी आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुढं पत्रकारांच्या प्रश्न उत्तराला सामोरे जाताना ते म्हणाले की, कर्जमाफी मिळेल. शंभर टक्के मिळेल, सरकारने जो जो शब्द दिला तो तो आम्ही पाळला.प्रत्येक जनाची गरज समजून हे सरकार पाऊल टाकतेय असेही ते म्हणाले.

पत्रपरिषदेला माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा सरचिटणीस रविजी बेलूरकर, मंडळ अध्यक्ष अविनाश लांबट, नितीन वासेकर, श्रीकांत पोटदुखे आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post