टॉप बातम्या

शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शैक्षणिक सत्र 2025-26 आज सोमवार 23 जून पासून सुरु झालेले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटप हा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो. शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. 

कोसारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळेचा पहिला दिवस म्हणून नवगताचे उत्सहात स्वागत केले व पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठयपुस्तके, बुक वाटप केले आहे. 

यावेळी शाळा सुधारक समिती अध्यक्ष सुभाष दादाजी खडसे, उपाध्यक्ष निलिमाताई दिनकर, कोसारा ग्रामपंचायत सरपंचा छायाताई खाडे, मुख्याध्यापिका बाभळे मॅडम, वेनू शाम, बाभळे सर, उपस्थित होते. 

आज शाळेच्या प्रथमदिनी गणवेश व पाठयपुस्तके मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आनंद पहायला मिळत होता. विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला की त्यांचा शाळेत येण्याचा उत्साह वाढतो,अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.
दरम्यान शाळेची रंगरंगोटी व विविध रंगबिरंगी फुग्यांची सजावट ही आकर्षणाच्या केंद्रस्थानी होती.

Previous Post Next Post