टॉप बातम्या

कोणी रेती देता का? रे रेती?...लाभार्थ्यांची थट्टा, तस्करांची मज्जा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : कोणीही बेघर राहू नये अशी संकल्पना जाहीर करून शासनाने घरकुल योजना राबविली. अनेकांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण होताना दिसत असले तरी, बांधकामात महत्वाची भूमिका बजावणारी "रेती" हिच मिळत नसल्याने अनेकांचे स्वप्न भंग होऊन त्यांना उघड्यावर दिवस रात्र काढायची वेळ आली आहे. 

मारेगाव तालुक्यात आपटी,कोसरा व सावंगी असे मोठे रेती घाट आहे.या घाटातून रेती लाभार्थ्यांना मिळत नसून ती तस्करांच्या घशात जात असल्याची सर्वत्र ओरड आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील वर्षी गाजावाजा करून शासनाने डेपो सुरु केले, परंतु लाभार्थ्यांना कोणी रेती देता का? रेती अशी म्हणायची पाळी आजतागायत आहे. सन 2024 चा हंगाम गेला आता सन 2025 लागलं तरी अनेकांचे घरं अर्धवट आहे. ती कम्प्लिट बांधकाम करण्यासाठी रेती मिळण्याची चित्र दूरदूर पर्यंत दिसून येत नाही. रेती धोरण जाहीर झाले, मात्र रेतीचा लिलाव थंड बसत्यात आहे. आता पावसाळा अगदी तोंडावर आलाय, घरं मोडून मांडव टाकून बसलेली लाभार्थी रेती आज मिळेल, उद्या मिळेल ह्या आशेवर आहे. परंतु रेती मिळणे दुरापास्त झालेलं आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन निवांत बसून आहे. रेती या गंभीर विषयावर चिकार शब्दही कोणी काढायला तयार नाहीये. रेती घाट का सुरु करण्यात येत नाही, अशी ओरड एकीकडे असताना दुसरीकडे रेती तस्करांना कुठून मिळत आहे,हा चिंतनाचा विषय आहे. 

मात्र, कोणी रेती देता का? रेती? अशी म्हणायची वेळ लाभार्थी, मटेरियल व्यावसायिक, मजूर यांच्यावर आल्याचं दिसून येत असून उपासमारीची वेळही ओढावल्याचे बोलल्या जात आहे. 

कारवाया करा,रेतीवर आळा घाला दुमत नाही. परंतु लाभार्थ्यांची थट्टा, तस्करांची मज्जा असं होऊ नये, समोर पावसाळ्याचे दिवस आहे. शासनाने तत्काळ रेती लाभार्थी, बांधकाम धारकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.
Previous Post Next Post