Page

शेतकऱ्याची घरातच गळफास लावून आत्महत्या

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कायर येथे एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवन संपवल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

बंडू विठ्ठल गुरनुले (अंदाजे वय 47) असं त्याच नाव आहे. बंडू यांनी 19 मे रोजी दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास कायर येथील राहत्या घरात गळफास घेतला. कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेल्याने गुरनुले कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन आणि इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मात्र,त्याचे गळफास घेण्याचे कारण अष्पष्ट असून त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी, असा आप्त परिवार आहे.

 पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.