टॉप बातम्या

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म, आरोपी गजाआड

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : अल्पवयीन मुलीला नातेवाईकांकडे सोडून देतो म्हणत तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी वैभव राजूरकर (वय 22) रा. बोदाड (राजूर) या संशायित आरोपीस अत्याचार, अँट्रॅसिटी अँक्ट व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून गजाआड करण्यात आले आहे. 
16 वर्षीय पीडित मुलीने मारेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. पीडितेचे आईवडील बाहेरगावी गेले होते, ती घरी एकटी राहण्यापेक्षा तिने नातेवाईकाकडे जाने पसंत केले व ती त्यांच्याकडे जाण्यासाठी निघाली असता वाटेत पीडित मुलीला दुचाकीने सोडून देतो म्हणून आग्रह धरत राज्मार्गावरील झुडूपात नेत बळजबरीने दुष्कर्म केले व याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशातच पिडीता हीच्या पोटात दिवसागणिक अंकुराची वाढ होत असल्याची फिर्याद मारेगाव पोलिसात दाखल करण्यात आली.
त्यानुसार संशायित आरोपीस कलम 64(1), 3(1) 4, 3(1) 3(2) नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.




Previous Post Next Post