टॉप बातम्या

विद्युत स्पर्शाने बार कामगार ठार

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आज गुरुवारी दुपारी येथील राज्य महामार्गावरील एका बिअर बार मध्ये असलेल्या कामगाराला जिवंत विद्युत स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
गणेश गणपत मेश्राम (28) रा. पेंढरी असं विद्युत स्पर्श झालेल्या मृतकाचे नाव आहे.या दुःखद घटनेने मेश्राम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. 

गेल्या अनेक दिवसापासून मारेगाव करणवाडी रस्त्यालगत असलेल्या एका बिअरबार मध्ये गणेश हा कामगार म्हणून कार्यरत होता.
आज गुरुवार ला दुपारी बारा वाजताचे सुमारास बार समोर असलेल्या संरक्षण जाळीला विद्युत स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात हलविले मात्र,डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका होतकरू युवकाच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. 

गणेश याच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व तीन महिन्याची मुलगी आहे.
Previous Post Next Post