 |
संग्रहीत छायाचित्र |
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील दीपक भास्कर रामटेके या तरुणाने वेगाव शेत शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. मृताच्या पश्चात आईवडील, व विवाहित बहीण असा परिवार आहे.