टॉप बातम्या

कोसारा घाटात महसूल विभागाची कारवाई: एक ब्रास रेती सह ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्याच्या शेवट च्या टोकाला वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. त्या नदीच्या पात्रातून रेती चोरून नेत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला कळताच पथकाने धाड टाकून कोसारा घाटात शनिवारी सायंकाळी पाच च्या दरम्यान ही कारवाई केली. राजेंद्र रत्न जाधव यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्र. (एम 29 सी बि 98) एक ब्रास रेती सह ट्रॅक्टर व ट्रॉली मारेगाव तहसील कार्यालय येथे दंडात्मक कारवाई करिता उभा केला आहे. सदरची कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, तलाठी सनी कुळमेथे, तलाठी विवेश सोयाम, यासह महसूल पथकाचे चमूने केली. 


Previous Post Next Post