मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा सराटी ग्रामपंचायत कार्यालयात परमपूज्य भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम कुमरे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशांत टेकाम, उपसरपंच, विष्णूजी कांबळे, ग्राम. प. सदस्य, गणपतराव आत्राम ग्राम. प. सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील नागरिक उपस्थित होते.