सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील जनतेच्या न्यायिक हक्कासाठी 'लढा' ही संघटना सर्व सामान्यांच्या हक्कासाठी,अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, शैक्षणिक व सामाजिक हितासाठी कार्य करित असते. संघटनेच्या धोरणनुसार याच संघटनेने वणी पंचायत समिती च्या 34 जिल्हा परिषद शाळेच्या कामात प्रचंड घोळ झाल्याची तक्रार केली असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आहे.
निवेदनात नमूद असे की, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे दिनांक 30/9/2022 ला ई वर्ग जमीन हर्रासाचे जमा रकमेतून खर्चास मंजुरी प्रदान करण्यात आली.त्या अनुषंगाने मा.गटविकास अधिकारी वणी यांनी 34 जिल्हापरिषद शाळेत एकूण 1,40,42,320 रुपयाची कामे केली. ही सर्व कामे शाळा व्यवस्थापन समिती अथवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला विचारत न घेता मर्जितल्या ठेकेदाराला सर्व कामाचे कंत्राट दिले असून मा.गटविकास अधिकारी वणी याचा मोठा भष्ट्राचार व कामात प्रचंड अनियमितता केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व कामाच्या चौकशीची मागणी लढा संघटनेचे प्रतिनिधी प्रवीण खानझोडे व विकेश पानघाटे, विवेक ठाकरे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ यांच्याकडे केली आहेत.