टॉप बातम्या

डॉ.आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात निषेध मोर्चा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : डॉ. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दि. 23 डिसें. 2024 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, वणी तालुक्याच्या सदस्यांनी उपविभागीय कार्यालय वणी गाठले व तीव्र शब्दात निषेध करत गृहमंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली. आज सोमवारी महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या बाबत निंदनीय वक्तव्य केले. त्यामुळे जगभरातील आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी व तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सर्वांनी एकाच आवाजात केली असून निदर्शने केली. त्यांनी महामहिम राष्ट्र्पती व पंतप्रधानांना एक मागणी पत्र दिले.

संताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी वणी, आंबेडकरी विचार मंच, भीम टायगर सेना, व विविध सामाजिक संघटना आदींचा समावेश होता.


Previous Post Next Post