सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : उद्या येतील, तोंडावर फेकून पैसे मारतील तुमच्या. कारण त्यांना माहितीये की,समोर बसलेले चिडत नाही, चिडू शकत नाही, हे आमचे गुलाम आहे. निवडणुकीच्या दिवशी फरफटत येतील. उन्हातान्हात रांगेत उभे राहतील, मतदान आम्हालाच करतील. जो पर्यंत यांची जागा, लायकी तुम्ही दाखवणार नाही तो पर्यंत आकडे वाढत राहतील, जर पुन्हा तुम्हाला असल्या लोकांना मतदान करायचं असेल तर तुमचं आयुष्य तुम्हाला लखलाभ असो. असे राज ठाकरे यांनी वणी येथील राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित करताना म्हणाले.
राज ठाकरेंनी वणी (ता.5 नोव्हेंबर) येथील शासकीय मैदान पाण्याच्या टाकी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले. आत्महत्या ही यवतमाळ जिल्हाची ओळख; तरी देखील ह्यांना आपण मत देतो. हिच वेळ आहे या असल्या लोकांना घरी बसवण्याची. निवडणुकीच्या दिवशी जिवंत राहा, मतदान केल्या नंतर मेलात तरी चालेल, असे राज ठाकरे भर सभेत कडाडले. मी असल्या फुकट च्या योजना देणार नाही, मी हाताला काम आणि महिलांना सक्षम करणार असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंगळवारी सायंकाळी मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्यासह गजानन वैरागडे वासिम विधानसभा, सागर दुधाने, बेंजराम किनकर, प्रवीण सूर, गणेश बरबडे, अश्विन जयस्वाल, सतीश चौधरी, संदीप कोरू, घनश्याम निखाडे, आदित्य दुरुतकर सचिन भोयर आणि सचिन चौधरी या उमेदवारांसाठी वणीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे.