टॉप बातम्या

हे आहेत अंतिम उमेदवार, यांची माघारी, तर 'हे' झाले बाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 76-वणी विधानसभा निवडणुकीच्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मनसेचे राजू मधुकरराव उंबरकर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय निळकंठ देरकर, भाजपाचे संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अनिल घनश्याम हेपट, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र कवडुजी निमसटकर, बहुजन समाज पार्टीचे अरुणकुमार रामदास खैरे, संजय रामचंद्र खाडे, तसेच केतन नत्थुजी पारखी, नारायण शाहू गोडे, हरिष दिगांबर पाते, निखिल धर्मा ढुरके आणि राहुल नारायण आत्राम हे उमेदवार आहेत.

दरम्यान, यशवंत शिवराम बोंडे, अजय पांडुरंग धोबे, आसिम हुसैन मंजूर हुसैन आणि प्रवीण रामाजी आत्राम यांनी आज आपले अर्ज मागे घेतले. तसेच छाणणीच्या वेळी देवराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, रत्नपाल बापूराव कनाके, संतोष उद्धवराव भादीकर यांचे अर्ज अवैध ठरवले गेले होते. यामुळे रिंगणात आता 12 उमेदवार कायम आहेत. 
Previous Post Next Post