टॉप बातम्या

एसटी प्रवाशांना धक्का ! ST चा प्रवास महागला; ऐन दिवाळीत वाढले तिकिटाचे दर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

दसऱ्यानंतर आता दिवाळीचा मोठा पर्व येणार आहे. दिवाळी सणाला नेहमीच शहरात कामानिमित्त स्थायिक झालेले नागरिक आपल्या मूळ गावाकडे, मामाच्या गावाकडे परतत असतात.

अशातच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ती म्हणजे आता एसटी महामंडळाने यावर्षीच्या दिवाळीच्या काळात तिकिटांचे दर वाढवण्यात आलेले. हाती आलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने या वर्षी दिवाळी दहा टक्के भाडेवाढ जाहीर केलेली आहे. दरवर्षी सणासुदीच्या ST महामंडळ हंगामी भाडेवाढ करत असते.

एसटी महामंडळाने केलेले हे भाडेवाढ 25 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी असणार आहे. परंतु आधीच्या तिकिटाच्या दरानुसारच हे भाडे आकारले जाणार आहे. प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र या दिवाळीत आर्थिक फटका बसणार आहे. परंतु एसटी महामंडळाला मात्र या निर्णयाचा फायदा होणार आहे.


Previous Post Next Post